धुंद पावसात
तूच होतीस बाजूला हातामध्ये हात..
थंडीगार लहर अन अंगावर शहरे,
खवळलेला समुद्र अन अस्वस्थ किनारे
ओलेचिंब अंग अन कुडकुडणारे दांत ..
तूच होतीस बाजूला अन हातामध्ये हात
पहिला.. दूसरा.. भिजण्याला कुठली अट,
तुझ हसण,लाजन,किती नटखट ,
बेभान होऊन नदी जशी मिळते सागरात,
तशीच वेडी व्हायची.. तू मला शोधण्यात
पुनः गार हवा अन रिमझिम बरसात..
तूच होतीस बाजूला.. हातामध्ये हात
म्हणत होतीस नेहमी तुझ्यातच राहीन
बनून मातीवाणी तुझी वाट पाहीन
असे कित्येक पावसाळे गेलेत
बघून एकमेकांच्या डोळ्यात
तूच होतीस बाजूला अन हातामध्ये हात ..
आता परत पाऊस आलाय
हिरवी गाणे गात
मि एकटाच उभा आहे
या धुंद पावसात ..
मि खुप वेळ बघितल
पण सापडेना तुझ्या हात ..
मग शोधल्यावर कळल ..
आता तुझ्या मनामध्ये फक्त माझी जात
आता तुझ्या मनामध्ये फक्त माझी जात
Khup bhari ahe ek no.
ReplyDelete