Posts

सिद्धार्थ शुक्ला चे निधन:भारतीय मीडिया

Image
एखाद्या सेलिब्रिटी चे निधन ही नक्कीच दुःखद घटना आहे, त्याचा शोक हा होणारच परंतु आपल्याकडे त्या घटनेचं भांडवल बनविल्या जात आहे आणि त्याच्याआडून प्रस्थापित महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यात यशस्वी होतांना दिसत आहेत. सिद्धार्थ चे जाणे आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया या ला त्याच्याशिवाय विषय च मिळत नसणे किती आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे. बरं त्याचा मृत्यू हार्ट attak ने झालाय ? महागाई, महापूर, बेरोजगारी, कोरोनाच्या बातम्या यांना कालबाह्य वाटायला लागतात? आपण व आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे यावर चिंतन करण्याची गरज आहे. बाकी सिद्धार्थ शुक्ला ला भावपुर्ण श्रद्धांजली

'सावधान इंडिया' क्राईम पेट्रोल बघायचे की नाही?

देशात कोणत्यातरी भागात सतत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात, त्यामध्ये महिलांवरील अत्याचार, खुन, दरोडा,पती पत्नी वादातून होणारे गुन्हे इत्यादी. आणि त्या घडलेल्या गुन्ह्याच्या आधारावर काही चॅनेल मालिका बनवून दाखवीत असतात. पण मग त्या मालिका बघितल्यावर प्रश्न पडतो की त्या गोष्टी खरचं घडलेल्या आहेत का? अश्याही प्रकारे गुन्हे घडत असतील का? खरच एवढ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या समाजात आहेत का? यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होतात  माझ्या मते गुन्हे घडतात त्याची कारणेही असतात पण टीव्ही चॅनेल्स त्या गोष्टी अधिक रंजक करून दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. काही घरांमध्ये जर आपण गेलो,परत परत गेलो तर त्यांच्या घरी टीव्हीवर आपल्याला सतत हेच कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येईल. कधी कधी बघणं ठीक आहे पण सतत आपण जर ह्या क्राईम स्टोरी बघत गेलो तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या वर्तमान वैयक्तिक आयुष्यात दिसायला लागतात. आपण बऱ्याचदा वर्तमानपत्र व इतर ठिकाणी वाचत असतो की असले कार्यक्रम बघुन सुद्धा अनेक गुन्हे घडलेले आहेत आणि घडतात सुदधा... पत्नी पतीवर काहीच कारण नसतांना संशय घेते...? मनामध्ये नेह...

धुंद पावसात

           बेभान वारा अन धुंद पावसात,             तूच होतीस बाजूला हातामध्ये हात..            थंडीगार लहर अन अंगावर शहरे,             खवळलेला समुद्र अन अस्वस्थ किनारे             ओलेचिंब अंग अन कुडकुडणारे दांत ..           तूच होतीस बाजूला अन हातामध्ये हात   पहिला.. दूसरा.. भिजण्याला कुठली अट,  तुझ हसण,लाजन,किती नटखट ,  बेभान होऊन नदी जशी मिळते सागरात,  तशीच वेडी व्हायची.. तू मला शोधण्यात  पुनः गार हवा अन रिमझिम बरसात..  तूच होतीस बाजूला.. हातामध्ये हात   म्हणत होतीस नेहमी तुझ्यातच राहीन   बनून मातीवाणी तुझी वाट पाहीन   असे कित्येक पावसाळे गेलेत   बघून एकमेकांच्या डोळ्यात  तूच होतीस बाजूला अन हातामध्ये हात ..   आता परत पाऊस आलाय हिरवी गाणे गात  मि एकटाच उभा आहे या धुंद पावसात ..   मि खुप वेळ बघ...

आता पोपटलाल काय करणार?तारक मेहता का उलटा चष्म्या मध्ये घडले असे काही .......?

  तारक मेहता का उलटा चष्ममा या लोकप्रिय मालिकेत नेहमीच काहींना काही तुफानी गोष्ट घडत असते,आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी गोकुळधाम वासी वेगवेगळ्या भन्नाट आयडिया काढत असतात म्हणूनच तर आजही लोक आवडीने ही सिरीयल बघत आहेत. सध्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत मग यात गोकुलधाम सोसायटी कशी मागे राहणार?. पत्रकार पोपटलाल औषध व लसी चा काळाबाजार करणार्याना पकडायला निघाला सोबत जेठलाल व चंपक चाचा आणि बग्गा पण आलाय पण पोपटलाल आणि भारती ला या गुंडांनी पकडलं आणि त्यांना मारून टाकण्याचा हुकूम दिलेला आहे. सध्या पोपटलाल ला शोधण्यासाठी जेठालाल शर्तींचे प्रयत्न करीत आहे. तिकडे पोपटलाल एक एक मिनिट मरणाची वाट बघत आहे. नेमकं काय होणार आहे पुढे?

आपण किती दिवस झोपेचे सोंग घेणार आहोत..?

 तसा आपला भारतीय समाज एखाद्या गोष्टींविषयी निषेध करण्यात अग्रेसर असतो मग ती एखादी छोटी गोष्ट असेल वा एखादा आंतरराष्ट्रीय मुद्दा असो सगळे बिनधास्त बोलतात. आणि आता तर समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे ते अगदी सहज झाले आहे. दररोज नवनवीन हॅशटॅग, viral व्हिडीओ, अश्या अनेक माध्यमातून प्रत्येकजण व्यक्त होत असतात. एकंदरीत एक जागृत समाज निर्माण झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. पण दुसरीकडे सध्या देशात वाढत असलेली महागाई, तेलाच्या किमंतीमध्ये झालेली प्रचंड वाढ, गोडेतेल तर 200रुपये च्या पुढे जाऊन पोहचले आणि या महागाई मुळे इतर वस्तु व खाद्यपदार्थ यांचे भाव गगनाला भिडले आहेत.10 रुपयाला मिळणारी कचोरी 20 रुपयाला मिळत आहे. पण दुसरीकडे एखाद्या छोट्या गोष्टींवर आगडोंब उठवणारे नेटिझन्स व जागृत नागरिक या महागाईवर मुंग गिळून बसलेले आहेत. कुणी काही बोलायला च तयार नाही.सगळे भाववाढीचा जणू आनंदच साजरा करत आहेत. सर्वसामान्यांना जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतांना सगळ्यांनी असं शांत राहणं हे धोक्याचे लक्षण आहे.म्हणून आता तरी विचार करून चुकीच्या गोष्टींचा निषेध आपण करायला पाहिजे नाहीतर पुन्हा आपली वाटचाल ग...