'सावधान इंडिया' क्राईम पेट्रोल बघायचे की नाही?

देशात कोणत्यातरी भागात सतत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात, त्यामध्ये महिलांवरील अत्याचार, खुन, दरोडा,पती पत्नी वादातून होणारे गुन्हे इत्यादी.
आणि त्या घडलेल्या गुन्ह्याच्या आधारावर काही चॅनेल मालिका बनवून दाखवीत असतात.
पण मग त्या मालिका बघितल्यावर प्रश्न पडतो की त्या गोष्टी खरचं घडलेल्या आहेत का?
अश्याही प्रकारे गुन्हे घडत असतील का?
खरच एवढ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपल्या समाजात आहेत का?
यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होतात 
माझ्या मते गुन्हे घडतात त्याची कारणेही असतात पण टीव्ही चॅनेल्स त्या गोष्टी अधिक रंजक करून दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात.
काही घरांमध्ये जर आपण गेलो,परत परत गेलो तर त्यांच्या घरी टीव्हीवर आपल्याला सतत हेच कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येईल.
कधी कधी बघणं ठीक आहे पण सतत आपण जर ह्या क्राईम स्टोरी बघत गेलो तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या वर्तमान वैयक्तिक आयुष्यात दिसायला लागतात.
आपण बऱ्याचदा वर्तमानपत्र व इतर ठिकाणी वाचत असतो की असले कार्यक्रम बघुन सुद्धा अनेक गुन्हे घडलेले आहेत आणि घडतात सुदधा...
पत्नी पतीवर काहीच कारण नसतांना संशय घेते...?
मनामध्ये नेहमी भीतीचे वातावरण तयार होते...
बऱ्याचदा यामध्ये घटस्फोट होण्याचे घटना पण घडत आहेत.
आम्ही लोकांना घडणाऱ्या गुन्ह्या पासून सावध करीत असतो अशी भूमिका चॅनेल्स वाले बोलून दाखवीत असतात पण वास्तव वेगळेच आहे.
म्हणून काही गोष्टी आपण मनोरंजन पुरत्या मर्यादित ठेवल्या आणि त्यांचा वैयक्तिक आयुष्याशी संबंध नाही जोडला तर अधिक चांगले...!

असे कार्यक्रम बघायला काहीच हरकत नाही पण सतत फक्त हेच कार्यक्रम बघत असणे ही धोक्याची घंटा आहे आणि तो धोका पण आपण लक्षात घेतला पाहिजे.
म्हणून बघा पण सावधान राहूनच बघा....

Comments

Popular posts from this blog

सिद्धार्थ शुक्ला चे निधन:भारतीय मीडिया

धुंद पावसात